अनेकांना टीव्ही पाहण्याने, संगणकावर काम केल्याने डोळ्यांवर थकवा जाणवतो. मग त्यावर काय उपाय करावेत हे समजत नाही. त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत. हे केल्याने डोळ्यावरील थकवा काही क्षणात गायब होईल.

काकडी-
डोळ्यांचा थकवा आणि जळजळ दूर करायची असेल तर काकडीचा वापर करा. त्यासाठी काकडी घ्या अन् तिचे स्लाईस कापा. नंतर या स्लाईस डोळ्यावर ठेवा. यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये आराम मिळेल.

बटाटा-
डोळ्यांचा थकवा घालवायचा असेल तर बटाटा खूपच फायद्याचा आहे. घरात असलेला बटाटा घ्या त्याच्या स्लाईस कापा. नंतर त्या स्लाईस डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्याला खूप आराम मिळतो.

दूध-
शिवाय तुम्ही दूधाचाही वापर करू शकता. थंड दूध घ्या. त्यात कापसाचा बोळा घेऊन त्याचा पॅच बनवून डोळ्यांवर ठेवा.

कोरफड-
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोरफड. कापसाचा बोळा घ्या. तो कोरफडीच्या रसात किंवा कोरफडीच्या जेलमध्ये भिजवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्याची जळजळ कमी होते.

इतर बातम्या
नियमित पाळी येण्यासाठी करा; उपाय
भुवयांचे केस काळे आणि दाट करण्यासाठी घरगुती उपाय