कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सध्या 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. परंतु अनेकांना कोरोना लसीची नोंदणी कशी करायची, लसीकरण केंद्र कसं शोधायचं माहिती नाही. जाणून घेऊयात याविषयी माहिती
*कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र शोधायचं असेल तर त्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत.
एक म्हणजे कोविन ॲप https://www.cowin.gov.in/home आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेतू ॲप.
* 1) https://www.cowin.gov.in/home यावर लसीकरणासंदर्भात नंबर, लसीकरणाचे ठिकाण याची माहिती देण्यात आली आहे. तसेच यावर क्लिक करून तुम्हाला कोरोना लसीसाठी नोंदणीही करता येते. त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन करता येईल.
* शिवाय यावर तुम्हाला एक मॅप दिसेल. तिथे तुम्हाला सर्च ऑप्शनचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही गाव, शहर, जिल्हा आणि राज्याचे नाव टाकून कोरोना लसीकरण केंद्र शोधू शकता.
2) आरोग्य सेतू ॲपवरही कोरोना लसीकरण केंद्र शोधता येते. या ॲपवरही कोरोना लसीकरण केंद्राची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा, राज्य, नगरपंचायत यांच्या वेबसाईट्स तसेच सोशल मीडिया अकाऊंट यावरही कोरोना लसीकरण केंद्राची माहिती देण्यात आली आहे.