त्वचेवरील मृत त्वचा काढून त्वचेला नैसर्गिक तजेला देण्याचे काम स्क्रब करत असते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करणंही महत्त्वाचं आहे. मात्र स्क्रब योग्य पद्धतीने करावे अन्यथा त्वचेचे नुकसान होते.
i) कॉफी स्क्रब
कॉफी स्क्रब अनेक पद्धतींनी बनवता येतो.
१) कॉफी आणि पाणी मिक्स करून स्क्रब बनवा.
२) कॉफीमध्ये पाणी आणि थोडा लिंबाचा रस मिसळा.
३) कॉफीमध्ये मध मिक्स करून स्क्रब बनवा.
४) कॉफीमध्ये नारळ तेल मिक्स करूनही स्क्रब बनवता येतो.
ii) मध, साखर आणि लिंबू स्क्रब
एक चमचा साखर आणि एक चमचा मध मिक्स करा. ज्यांच्या त्वचेला लिंबू सूट होत त्यांनी मध आणि साखरेच्या स्क्रब मध्ये थोडा लिंबाचा रस टाकला तरी चालेल. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघू जातील. शिवाय लिंबामुळे त्वचा चमकदार बनेल.
iii) टोमॅटो स्क्रब
१) टोमॅटो अर्धा कापून घ्या. कापलेल्या टोमॅटोवर साखर टाका. हा टोमॅटो चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून चेहऱ्याला स्क्रबिंग करा.
२) टोमॅटो बारीक कापून थोडा हाताने कुस्करून घ्या. त्यामध्ये ग्रीन टी आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून स्क्रब बनवा.
iv) स्ट्रॉबेरी स्क्रब
पिकलेली स्ट्रॉबेरी हाताने कुस्करून घ्या. त्यामध्ये मध आणि साखर टाकून स्क्रब बनवा.
शाकाहारी असलेल्यांना ‘प्रोटीन’साठी मांस खायची गरज नाही; ‘या’ फळांमध्ये आहे भरपूर प्रोटीन