मॅग्निशयम हा घटक वृक्ष, जनावरे आणि मनुष्यांच्या शरीरातही मोठ्या प्रमाणात असते. मानवी शरीरासाठी हा घटक अत्यंत महत्वाचा समजला जातो. पबमेड सेंट्रलच्या एका अहवालानुसार मॅग्निशियम शरीरातील रासायनिक प्रक्रियेसाठी आणि शरीर आरोग्यदायी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे रोज 400 मिलीग्रॅम मॅग्निशियमचे सेवन आहारातून झाले पाहिजे. मात्र हे मॅग्निशयम असते कोणत्या पदार्थांत? चला तर आपण हे जाणून घेऊयात.
आपल्या घरात आणि बाजारात मॅग्निशियमने भरपूर असलेले पदार्थ सहज उपलब्ध होतात. हे पदार्थ खाऊन आपण आपल्या शरीरातील मॅग्निशयमचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवू शकतो. या पदार्थ्यांच्या यादीत सहभाग होतो तो डार्क चॉकलेट आणि अॅवाकोडोचा.
डार्क चॉकलेट :
डार्क चॉकलेट ना की फक्त चवीला स्वादिष्ट असते तर मॅग्निशयमचा साठाही त्यात मोठ्या प्रमाणात असतो. फूड डेटा सेंट्रलच्या माहितीनुसार 28 ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये 64 मिलीग्रॅम मॅग्निशनय असते, जे आरडीआयच्या 14 टक्के असते. यूएस एनआयएचच्या माहितीनुसार डार्क चॉकलेटमध्ये लोह, कॉपर आणि मॅग्निज याचे प्रमाण भरपूर असते. हा एचडीएल चांगल्या कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवतो आणि हृदयाच्या विकाराचा धोका कमी होतो.
अॅवाकाडो :
न्यूट्रिशन डेटाच्या माहितीनुसार, एका मध्यम आकाराच्या अॅवाकाडोमध्ये 54 मिलीग्रॅम मॅग्निशयम असते, जे की आरडीआयच्या 15 टक्के असते. अॅवाकाडोमध्ये पोटॅशियम, व्हिटामिन बी, के असतात. जे हृदयाला तंदुरुस्त ठेवतात. अॅवाकाडोतील फायबरमुळे अॅवाकाडो पचनास मदत करतो. अॅवाकाडो कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारण्यास फायदेशीर ठरतो.
काजू, बदाम :
काजू, ब्राझील नट्स आणि बदाम यामध्ये मॅग्निशियमचे प्रमाण भरपूर असते. 28 ग्रॅम काजूमध्ये 82 मिलीग्रॅम मॅग्निशियम असते, जे आरडीआयनुसार 20 टक्के असते. पबमेड सेंट्रलनुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यास काजू, बदाम मदत करतात. ब्राझील नट्स हृदयाच्या विकारांना दूर ठेवतात.