आजकाल लोक आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक होत आहेत. अनेक लोक साखरेऐवजी गुळाच्या वापराला प्राधान्य देत आहेत. मात्र नफा मिळवण्यासाठी आजकाल बाजारात बनावट गूळ बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. गुळामध्येच जर भेसळ असेल तर त्याला काही फायदा होणार नाही. शिवाय त्याचे शरीरावरही दुष्परिणाम होतील. वजन वाढवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट तर रंग देण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट यांसारख्या घातक रसायनांचा वापर भेसळयुक्त गुळामध्ये करतात. जाणून घ्या गुळातील भेसळ कशी ओळखावी याविषयी –
- गुळाची निवड करताना त्याचा रंग पाहून घ्या. भेसळयुक्त गूळ पिवळसर किंवा फिक्कट तपकिरी रंगाचा दिसतो. त्यामुळे गूळ खरेदी करताना तपकिरी रंगाच्या गुळाची निवड करा.
- भेसळयुक्त गूळ पाण्यात ठेवाल तर त्यातील भेसळयुक्त पदार्थ हे पाण्याच्या तळाशी जातील किंवा पाण्यावर तरंगतील आणि चांगला गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल.