धनुरासन करताना शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होत असतो. म्हणून या आसनाला ‘धनुरासन’ म्हणतात.
धनुरासन कसे करावे
प्रथम पोटावर झोपा. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा तसेच हात शरीरालगत राहुद्यात.
नंतर गुडघ्यातून पाय दुमडून हाताने घोटे पकडा.
श्वास घेत जमिनीपासून छाती वर उचला आणि सरळ पुढे पहा. परंतु खूप ताण देऊ नका.
श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर रहा.
दीर्घ श्वास घेत रहा.
पंधरा-वीस सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा.
धनुरासन करण्याचे फायदे
तणाव आणि आळस कमी होऊन उत्साही वाटते.
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहते. तसेच रक्ताभिसरणाचा वेग वाढतो.
पोटदुखी किंवा पोटासंबंधित, अपचन, बद्धकोष्ठता, गॅस या समस्या दूर होतात.
पाय, हातांचे, पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट होतात.
पाठदुखी कमी होते. पाठ लवचिक बनते.
भूक वाढते.
हातापायांना मुंग्या येण्याचा त्रास कमी होतो.
टीप – धनुरासन शक्यतो रिकाम्या पोटी करावं. हर्निया, मानेचे विकार, रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी, पोटाची शस्रक्रिया झालेल्यांनी धनुरासन करू नये.