रागावर नियंत्रण कसे करावे
राग येणे ही एक नैसर्गिक घटना आहे. मात्र राग येणे ही आपली सवय, स्वभाव किंवा कमजोरी बनता कामा नये. कारण रागामुळे माणूस चिडचिडा आणि अस्वथ्य बनतो. रागीट माणसाला लोक नेहमी टाळतात. रागीट माणसे एकलकोंडी बनून अधिक चिडचिडी बनण्याचा धोका असतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवल्यास शिकावे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. खालील पद्धतींनी रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा आपल्याला खूप राग येईल, तेव्हा मोठा श्वास घ्या. ही कृती १०-१५ वेळा करा.
आपल्या मनात काय चाललंय, त्याकडे लक्ष द्या. आत्मचिंतन करून स्वतःमध्ये सुधारणा करा.
दररोज ७-८ तास शांत झोप घ्या. यामुळे चिडचिड होत नाही आणि आपले आपल्या रागावर नियंत्रण राहते.
राग येईल तेव्हा काहीतरी मनातल्या मनात गुणगुणत जा, असं केल्याने राग शांत होईल.
संतुलित आहार घ्या.
नियमित प्राणायम, योगा करा.
ज्या घटनेमुळे किंवा व्यक्तीमुळे राग आला असेल, चिडचिड होत असेल तर विसरण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा ती गोष्ट आठवत बसू नका.