उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण ड्रायफ्रुट्स अत्यंत गरम असतात. जाणून घ्या उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स अधिक प्रमाणात खाल्ले तर कोणत्या समस्या निर्माण होतात. तसेच जाणून घ्या उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन कसे करावे –

शरीरातील उष्णता वाढते
ड्रायफ्रुट्स अत्यंत गरम असतात. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता जास्त असते त्यात ड्रायफ्रुट्स अधिक प्रमाणात खाल्ल्याने शरीरात आणखी उष्णता वाढते. त्यामुळे तोंड येणे, पाईल्स, घामोळं येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

पोटाच्या समस्या निर्माण होतात
ड्रायफ्रुट्समुळे पचन संस्था खराब होऊ शकते. ओटीपोटात दुखणं, पोटात चमकणे, अपचन आणि लूज मोशन्स यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

वजन वाढते
ड्राय फ्रूटमध्ये भरपूर कॅलरी असतात. त्यामुळे उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजनही वाढू शकते.

उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन कसे करावे

उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवून खावेत.

उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन किती प्रमाणात करावे

बदाम – बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, बदामाची साल काढा आणि सकाळी खा. उन्हाळ्यात मुलांना दिवसातून २ पेक्षा जास्त बदाम खाऊ घालू नका.तसेच प्रौढांनी उन्हाळ्यात दिवसातून 3 ते 4 बदाम खावेत.

अंजीर- भिजवलेले अंजीर देखील १-२ च खावेत.