सुकामेवा खरेदी करताना काजू, बदाम, खारीक, पिस्ता, अंजीर यांनाच प्राधान्य दिले जाते. मात्र अक्रोडच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांची माहिती नसल्याने बहुगुणी असणारे अक्रोड अनेकदा दुर्लक्षित राहते. उच्च रक्तदाब,मधुमेहा सारख्या आजारांवर अक्रोड गुणकारी आहे. अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पौष्टिक घटक असतात.
एका दिवसात किती अक्रोड खावेत?
दररोज 2-3 अक्रोड खाणे आवश्यक आहे. मात्र, जास्त प्रमाणात अक्रोड खाऊ नये. अक्रोड खाण्याचे अनेक फायदे असले तरी मात्र अक्रोड जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे शरीराचा दाह होतो.
अक्रोड कसे खावे?
हिवाळ्यात हवे असल्यास अक्रोड न भिजवता खाऊ शकता पण उन्हाळ्यात अक्रोड भिजवल्यानंतरच खावे. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी खा. अशा प्रकारे अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदे होतील.
अक्रोड खाण्याचे फायदे
निद्रानाशावर गुणकारी
अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते. मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे.
मेंदूची कार्यक्षमता वाढवते
अक्रोडमध्ये असलेल्या ओमेगा-3 फॅटी ॲसिडस, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि स्मरणशक्ती मजबूत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारते
अक्रोडमधील चांगले फॅट्स (मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स) हृदयासाठी फायदेशीर असून, हे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
अक्रोडमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यात मदत करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पचनक्रिया सुधारते
अक्रोड फायबरचा चांगला स्रोत असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
सौंदर्यवर्धक अक्रोड
i) अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. यामुळे केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.
ii) अक्रोडमध्ये ओमेगा-३ हा घटक त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण राहते.
iii) स्कीन स्क्रबसाठी करण्यासाठी अक्रोडचा वापर करतात.
iv) तजेलदार आणि ग्लोइंग स्किन हवी असेल तर दुधामध्ये अक्रोड पावडर टाकून पेस्ट बनवा. हा फेसपॅक १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. यामुळे स्किन फ्रेश आणि चमकदार बनते.
v) चेहऱ्यावरील काळे वांग असणाऱ्यांनी अक्रोड बारीक उगाळून त्याचा लेप चोळून लावावा. काळे वांग कमी होण्यास सुरूवात होते.