त्वचेच्या टॅनिंगची समस्या विशेष करून उन्हाळ्यात निर्माण होते. बऱ्याचदा स्लिव्हलेस किंवा हाफ बाह्यांचे कपडे घालून बाहेर उन्हात पडल्याने, ऑफिसमध्ये काम करताना टेबलवर ठेवल्याने हाताचे कोपरे काळे पडतात. त्याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर, त्यांचा काळपटपणा अधिकच वाढत जातो. त्यामुळे हाताकडे बघताना सर्वांत आधी नजर कोपराकडे जाते. हाताच्या कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते करून पाहा.
लिंबू
लिंबू आपल्याला घरात सहज उपलब्ध होतात. लिंबू कापून घ्या. त्यानंतर अर्धे लिंबू घेऊन हाताच्या कोपरांवर घासा. असं रोज केलं तर हाताच्या कोपरांचा काळेपणा जातो.
दूध
दूधानेही हाताच्या कोपरांचा काळेपणा दूर होतो. त्यासाठी कच्चे दूध घ्या. नंतर कापूस दूधात भिजत ठेवा. मग तो आपल्या हाताच्या कोपरांना लावा. नंतर ते धुवून काढा.
हळद
हळदीमध्ये बेसनपीठ आणि दूध मिसळून कोपरांना लावा. सुकल्यानंतर धुवून टाका.
बेकिंग सोडा
हाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा घ्या आणि तो दूधात मिसळा. त्यानंतर झालेली पेस्ट हाताच्या कोपरांवर लावा. काही वेळाने ती पेस्ट धुवून काढा. यामुळे हाताच्या कोपरांचा काळपटपणा दूर होतो.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यात एक चमचा साखर टाका. त्यानंतर हे मिश्रण हाताच्या कोपरांवर लावा. यामुळे कोपरांचा काळवटपणा दूर होऊन त्वचा चमकदार बनते.
मध
मधामध्ये हळद आणि दूध मिसळून कोपरांना लावा. सुकल्यानंतर धुवून टाका.
टीप – कोणताही उपाय एकदा केल्याने टँनिंग जात नसते. त्यासाठी नियमितपणे कंटाळा न करता उपाय करणे गरजेचे आहे.