साधारणतः खूप वेळ एका जागी बसून राहिल्याने, शीर दबल्याने, रक्त पुरवठा सुरळीत न झाल्याने किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पायाला मुंग्या येतात. वारंवार मुंग्या येत असतील तर, शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. पायाला मुंग्या आल्यामुळे पाय बधिर होतो, उठायला त्रास होतो, तोल जातो, पायांना खाज आल्यासारखी वाटते, कधीकधी पायाची आग पण होऊ शकते.
पायाला मुंग्या येत असल्यास हे घरगुती उपाय करा
तूप
रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करून घ्या. ते तळपायाला लावा. यामुळे पायाला मुंग्या येण्याची समस्या दूर होईल.
लसूण व सुंठ
सकाळी सुंठीचे काही तुकडे व लसणाच्या २ पाकळ्या चावून खा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.
कोमट पाणी आणि मीठ
कोमट पाण्यामध्ये जाड मीठ टाकून त्यात २० ते २५ मिनिट पाय बुडवून बसावे.
पिंपळाची पाने
पिंपळाची 3-4 पाने मोहरी तेलात उकळून घ्या. जेव्हा पायाला मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा.
शरीराची हालचाल करावी
दीर्घकाळ एकच जागी बसणे अथवा उभे राहणे टाळावे. थोड्या थोड्या वेळाने शरीराची हालचाल करत रहावी.
व्यायाम करा
दिनचर्येमध्ये व्यायाम योग यांचा समावेश करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे. यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिन भेटतो तसेच रक्ताभिसरणही सुरळीत राहते.
तेलाने मालिश करणे
रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे तळपायाची कोमट खोबरेल तेलाने मालिश करावी. यामुळे पायाच्या नसा मोकळ्या होतात.
शेक द्यावा
मुंग्या आल्यावर गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने ५-१० मिनिट पाय शेकवावा.
योग्य आहार घ्यावा
आहारामध्ये व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण वाढवावे. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी पालेभाज्या खाव्यात.
टीप – वारंवार जर पायाला मुंग्या येत असतील तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. कारण वारंवार पायाला मुंग्या येणे इतरही आजारांचे लक्षण असू शकते.