ब्लॅकहेड्स बहुतांशी नाकाजवळ येतात आणि मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात. चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. यालाच ब्लॅकहेड्स म्हणतात. जाणून घ्या ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरगुती उपाय –
अंडे
एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि १५-२० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.
केळीचे साल
केळीचे साल ब्लॅकहेड्स कमी करण्याचे काम करते. ब्लॅकहेड्सवर केळीच्या सालीचा आतील भाग चोळावा.
हळद
हळदीमध्ये खोबरेल तेल टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १०-१५ मिनिटांनंतर धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा.
बेकिंग सोडा
एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. १०-१५ मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
ग्रीन टी
एक चमचा हिरव्या चहाची पाने घ्या आणि पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.