घोट्यांचा काळेपणा वाढल्यानंतर सोबतच आजूबाजूची त्वचा देखील काळी पडण्यास सुरुवात होते. जाणून घ्या घोट्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय –

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये आढळणारे ब्लीचिंग गुणधर्म त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात. पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून घट्ट द्रावण तयार करून ते घोट्याना लावा. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होऊन त्वचेचा रंग सुधारेल. १० ते १५ मिनिटे लावल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.

खोबरेल तेल

खोबरेल तेल लावल्याने त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढू लागते आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्वचेवरील काळेपणाची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलाने आपल्या घोट्याची मालिश करा आणि रात्रभर तेल तसेच ठेवा. यामुळे घोट्यांवरील काळेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होईल.

कोरफड जेल

एलोइन आणि एलोसिनचे प्रमाण त्वचेवर वाढणारा काळेपणा दूर करण्यास कोरफड जेल मदत करते. कोरफड जेल लावताना आधी पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरफड जेलचा जाड थर घोट्याना लावा आणि सकाळी उठल्यावर धुवून टाका.कोरफड जेल त्वचेवर अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे. त्वचेमध्ये अतिरिक्त रंगद्रव्य वाढण्याच्या समस्येला हायपरपिग्मेंटेशन असे म्हणतात. मेलॅनिन पेशींच्या वाढीमुळे त्वचेवर काळोख वाढत जातो. यावर कोरफड फायदेशीर आहे.