व्हिनेगर
एक मग पाण्यामध्ये १ ते २ चमचे व्हाइट व्हिनेगर मिसळावे. या मिश्रणात ५-१० मिनिटे बोटे बुडवून ठेवावीत. नंतर स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवावे.
टूथपेस्ट
टूथपेस्ट नखांवर चोळा आणि सुकल्यानंतर नखं स्वच्छ करण्याच्या ब्रशने हळूवार नख घासा नंतर पाण्याने स्वच्छ करा.
टी ट्री ऑईल
नखांना टी ट्री ऑईल लावा. नंतर स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट नखांना लावा. १५ मिनिटांनी नखांच्या ब्रशने नखे साफ करून स्वच्छ धुवा.
लिंबाचा रस
लिंबाचा रस नखांना लावून १० ते १५ मिनिटे ठेवा.