वजन वाढ, हार्मोन्समधील बदल, चुकीची आहारपद्धती, वाढत वय यांसारख्या अनेक कारणांने हातावरील चरबी वाढू शकते. हातावरील मांस तेव्हाच सैल पडते जेव्हा त्यामध्ये चरबी जमू लागते. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळून येते. जाणून घ्या हातावरची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय –
शरीरातील चरबी कमी करा (Reduce body fat)
हातावरील चरबी कमी करण्यासाठी वजन आणि शरीरातील इतर चरबी करण्याकडेही लक्ष द्या. सकाळी हेल्दी नाश्ता करा. चहा- कॉफी, गोड आणि तेलकट पदार्थ कमी प्रमाणात खावेत. आहारामध्ये प्रोटीन वाढवावे. हंगामी फळांचा आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्या. तसेच पाणी अधिक प्रमाणात प्या. सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम करा.
हातावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम (Exercises to reduce hand fat)
पुश-अप्स (Push-ups)
पुश-अप्स हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. यामुळे शरीर सक्रिय आणि मजबूत राहण्यास मदत होते. तुमचे हात सुंदर बनवण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी तुम्ही क्लोज-ग्रिप पुश-अप करू शकता. यासाठी, तुम्ही पुश-अप्स करण्याच्या स्थितीत या आणि हळूहळू वर जा आणि नंतर खाली जा. या दरम्यान नियमितपणे श्वास घेत राहा. हे तुमची ताकद टिकवून ठेवेल आणि 15-15 चे चार सेट करण्याचा प्रयत्न करा. जरी सुरुवातीला 2 सेट देखील केले जाऊ शकतात.
बटरफ्लाय एक्सरसाईज (Butterfly exercise)
सरळ रेषेत उभं राहून दोन्ही हात समोर करा. आता हाथ खाद्यांच्या रेषेत समोर आणून तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. आता हात घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरवा. मग पुन्हा उलटे फिरवा. असं कमीत कमी 10 ते 12 वेळा करा.
या एक्सरसाईजच्या मदतीने तुमच्या केवळ हाताचीच चरबी नाही तर, शरीरातील अन्य भागाची चरबीदेखील कमी होते.
ट्रायसेप्स डिप्स (Triceps dips)
या व्यायामादरम्यान, तुमच्या शरीराचा संपूर्ण भार हातांवर असतो आणि ट्रायसेप्सहात सुडौल बनवतात.
व्यायाम करण्याची पद्धती
एका खुर्चीवर बास आणि हात खुर्चीच्या किनाऱ्यावर ठेऊन खुर्ची पकडा आणि पाय समोर घ्या. आता शरीर थोडं पुढे घ्या आणि पाय सरळ ठेवा आणि हात मागे घ्या. हळूहळू शरीर उचला आणि मग परत खाली आणा. पहिल्यांदा याचे तुम्ही तीन सेट करा आणि नंतर हळूहळू वाढवत रोज 15 सेट पूर्ण करा.
प्लांक आर्म एक्सरसाईज (Plank Arm Exercise)
सर्वात पहिले पोटावर झोपा आणि आपलं डोकं जमिनीला टेकवा. आता शरीराच्या वरच्या भागाला एक कोपरा लावत दुसऱ्या हाताचा कोपरा जमिनीवरून आणि पायाच्या पंजापासून वर घ्या आणि मांडीवर आणि पोटापासून वर उचलण्याचा प्रयत्न करा.