आजकल अनेकांना भुवयांचे केस गळण्याची समस्या सतावत आहे. ब्युटी प्रॉडक्टचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिमरीत्या भुवया दाट आणि काळ्या बनवता येतात. मात्र ब्युटी प्रॉडक्टच्या अतिवापराने भुवया अधिकच विरळ होऊ शकतात आणि नेहमीच मेकअप करणे शक्य देखील नाही. त्यामुळे या समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. भुवयांचे केस काळे आणि दाट करण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर भुवयांचे केस गळण्याची समस्या नक्कीच कमी होईल. जाणून घ्याभुवयांचे केस काळे आणि दाट करण्यासाठी घरगुती उपाय
कांद्याचा रस
केसांची वाढ होण्यासाठी कांद्याचा रस खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे भुवयांच्या वाढीसाठीही कांद्याचा रस लावू शकता. मात्र कांद्याचा रस भुवयांना लावताना डोळ्यात जाणार नाही याची खबरदारी घ्या. कारण कांद्याचा रस डोळ्यात गेल्याने डोळ्यांची आग, जळजळ होऊ शकते.
खोबरेल तेल
भुवया काळ्याशार आणि दाट करण्यासाठी खोबरेल तेल लावा. नंतर थोडा मसाज करा. त्यामुळे नक्की फरक जाणवेल.
कोरफड जेल
दिवसातून दोन वेळा कोरफड जेल भुवयांना लावा. थोडासा मसाज करा. यामुळे नक्की भुवया दाट आणि काळ्याशार होतील.
कच्चे दूध
कच्चे दूध कापसाच्या मदतीने दूध भुवयांना लावा. यामुळे भुवयांचे काळे आणि दाट होतील शिवाय त्यांना चमकही येईल.
मेथी दाणे
रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी मेथीदाण्याची पेस्ट करा. ही मेथीची पेस्ट भुवयांवर लावा. १०-१५ मिनिटांनी स्वच्छ धुवून टाका.
बदाम तेल
रात्री झोपताना बदाम तेलाने भुवयांची मालिश करा.