प्रदूषण, तेलकटपणा, धूळ, माती यांसारख्या कारणामुळे मान काळी पडते. तसेच आपण मानेपेक्षा चेहऱ्याच्याच स्वछतेकडे जास्त लक्ष देतो. परिणामी चेहरा चमकदार दिसतो आणि मान काळवंडलेली दिसते. काही घरगुती उपायांनी आपण मान उजळवू शकतो.
मान उजळण्यासाठी घरगुती उपाय –
1) बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल :
बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेला लावा. थोड्या वेळानंतर धुवून टाका. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाऊन रंध्रे स्वच्छ होतील आणि मान उजळेल.
2) बटाटा :
i) कच्चा बटाटा किसून मानेवर लावावा.
ii) बटाटा आणि लिंबाचा रस मानेवर लावावा. थोड्या वेळाने मान धुवून टाकावी.
3) लिंबू आणि मध :
लिंबू आणि मध यांचे मिश्रण मानेला लावा व लावल्यानंतर अर्ध्या तासाने मान स्वच्छ करा.
4) कोरफड :
कोरफडीचा रस रोज मानेवर लावल्याने मानेचा काळसरपणा निघून जाण्यास मदत होईल.
5) बेकिंग सोडा :
बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेला लावा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने मान धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.
उन्हाळ्यात नियमित खा जांभूळ आणि मिळवा उत्तम आरोग्यासोबत सुंदर, निरोगी त्वचा
उसाच्या रसाचे ‘हे’ पाच आश्चर्यकारक फायदे उन्हाळ्यात तुमचा थकवा करतील दूर!