स्ट्रेच मार्क्स पाठ, पोट, हात यांसारख्या अवयवांवर येतात. स्ट्रेच मार्क्सची समस्या महिलांना अधिक असते. वजन वाढले किंवा कमी झाले, हार्मोनल इनबॅलन्स यांसारख्या कारणांमुळे स्ट्रेच मार्क्स येतात.

स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय
वजन आणि मासपेशी यांचं प्रमाण अचानक वाढल्यानं शरीराच्या कुठल्याही भागात स्ट्रेच मार्क्स येतात. लाल, पांढऱ्या रंगाच्या रेषा शरीरावर दिसतात. त्यामुळे त्वचा खराब दिसायला लागते.

स्ट्रेच मार्क्सवर घरगुती उपाय

बदाम तेल-
स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर करण्यासाठी बदाम तेल वापरा. बदाम तेलाने त्वचेचे पोषण होते तसेच त्वचा चमकदार बनते.

कोको बटर
कोको बटर घ्या. त्याने दररोज रात्री मसाज करा. यामुळे स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून आराम मिळतो. या तेलाने रोज रात्री 15 मिनिटे मसाज करा.

हळद
हळद ही स्ट्रेच मार्क्सवर उत्तम पर्याय आहे. हळदीचा वापर केल्याने स्ट्रेच मार्क्सच्या खुणा लवकर जातात. त्यासाठी हळद घ्या. त्यात पाणी किंवा तेल टाका. आता ते मिश्रण दिवसातून दोनदा शरीराला लावा. नक्की फरक जाणवेल.

एरंडेल तेल
त्वचेच्या समस्यांवर एरंडेल तेल हा उत्तम असा उपचार आहे. स्ट्रेच मार्क्स शरीराच्या ज्या भागावर आला आहे त्या भागावर या तेलाने 10-15 मिनिटे मसाज करा. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सच्या खूणा लगेच जातात.

पिंपल्सची समस्या सतावतेयं? मग रात्री झोपताना ‘या’ उपायांचा अवलंब करा

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी टिप्स