केस जर रुक्ष, कोरडे आणि निर्जीव असतील तर केस फाटे फुटणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. केस सदृढ आणि निरोगी होण्यासाठी त्यांच योग्य प्रकारे पोषण पण होणं गरजेचे आहे. जाणून घ्या केसांना फाटे फुटणे या समस्येवर घरगुती उपाय –

बदामाचे तेल
बदामाचे तेल कोमट करून टाळूला आणि केसांच्या टोकाला लावून मसाज करा. १-२ तास किंवा रात्रभर राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.

खोबरेल तेल
हातावर थोडे तेल घेऊन केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.

दही
चार चमचे दही, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा ऑरगॅनिक मध मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावा आणि तासाभरानंतर केस धुवा.

मध
२-४ चमचे मधात ३ चमचे दूध आणि १ चमचा नारळाचे दूध मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. १ तासानंतर शॅम्पूने केस धुवा.

नारळाचे दूध
नारळाचे दूध केसांना फाटे फुटणे, केस गळणे कमी करते आणि हायड्रेट करते. नारळाचे दूध घेऊन केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. १ तासानंतर शॅम्पूने केस धुवा.

तूप
केस धुण्यापूर्वी कोमट तूप केसांना लावावे. हलक्या हाताने केसांना थोडा वेळ मालिश करावी. एक तासानंतर केस धुवून टाकावेत.
रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही केसांना कोमट तुपाने मालिश करून सकाळी केस धुवू शकता.

अक्रोड तेल
अक्रोड तेल गरम करून स्कॅल्प आणि केसांच्या टोकाला मसाज करा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी शॅम्पू करा.

एरंडेल तेल
दोन चमचे खोबरेल तेल दोन ते चार चमचे एरंडेल तेलात मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. १ तास ठेवल्यानंतर केस शॅम्पूने धुवा.

कांद्याचा रस
कांद्याचा रस, खोबरेल तेल आणि बदाम तेल एकत्र करा. आता हे मिश्रण केसांना लावा. १ तासानंतर शॅम्पूने केस धुवा.

एवोकॅडो
एवोकॅडो स्मॅश करा. त्यात बदामाचे तेल मिक्स करा. ही पेस्ट केसांना लावा. १ तासानंतर शॅम्पूने केस धुवा.