लिंबाचा रस आणि साखर
त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू खूपच फायदेशीर आहे. ३ चमचे लिंबाचा रस घ्या. त्यात थोडी साखर मिसळा. नंतर ते अंडरआर्म्सवर लावा आणि ५ मिनिटे मसाज करा.

बेसन आणि दह्याचा पॅक
अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दह्याचा पॅक हळद घालून लावा. 10 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.

बटाट्याचा रस
त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर आहे. बटाट्याचा रस अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणाची समस्या दूर होते. मात्र हा उपाय नियमितपणे करावा.

ओट्स आणि मध
ओट्स आणि मधही त्वचेचे टॅनिंग घालवते. ओट्स मधात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण अंडरआर्म्सवर स्क्रब करा. काही वेळाने ते स्वच्छ धुवा.

लिंबू आणि मध
लिंबू आणि मध एकत्र मिसळा. त्यानंतर हे मिश्रण ५ मिनिटे अंडरआर्म्सवर राहू द्या. नंतर थंड पाण्याने ते धुवा. याच्या नियमित प्रयोगाने नक्कीच फरक जाणवेल.

उभं राहून पाणी का पिऊ नये

रागावर नियंत्रण कसे करावे