हाताची त्वचा कोरडेपणा आणि रिंकल्स यामुळे रुक्ष होते. त्वचा जर रुक्ष झाली तर त्वचेवर सुरकुत्या पडतात. कोरडी पडलेली त्वचा निस्तेज दिसते. त्यामुळे वय जास्त असल्याचे जाणवते. वारंवार साबणाने हात धुणे, डिटर्जंट्स, सॅनिटायझरचा अति वापर, हातांना योग्य पद्धतीने हायड्रेटेड न करणे, त्वचेवरील मृत त्वचा न काढणे यांसारख्या अनेक कारणांमुळे हाताची त्वचा रुक्ष होते.
हाताच्या त्वचेचा रुक्षपणा आणि कोरडेपणा घालवण्यासाठी उपाय –
१) हाताच्या त्वचेवर कोरफड गर किंवा ओलोवेरा जेलने मालिश करा. यामुळे त्वचा मॉइश्चराइझ होते.
२) खोबरेल तेलाने हाताच्या त्वचेची मालिश करा. खोबरेल तेल हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
खोबरेल तेल त्वचेला पोषण देते. त्यामुळे रुक्षपणा कमी होऊन त्वचा मऊ, मुलायम बनते.
३) खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिक्स करून त्याने हाताच्या त्वचेची मालिश करा.
४) पेट्रोलीअम जेलीने हाताच्या त्वचेची मालिश करा. पेट्रोलीअम जेली आपल्या त्वचेवर एक थर तयार करते त्यामुळे त्वचा ओलसर राहते.
५) अंघोळीसाठी अति कडक किंवा वापरता कोमट पाण्याने अंघोळ करत जा.
६) केमिकलयुक्त साबण आणि सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा.
७) टोमॅटो, गाजर, मोड आलेली कडधान्ये, मासे, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करा.