माझं आरोग्य (Maz Arogya) : अनेकांच्या मानेवर काळपटपणा (reduce Dark Neck) दिसतो, त्यामुळे अनेकांना शरमही वाटते. मात्र अनेक उपाय करूनही बऱ्याचदा मानेवरचा काळेपणा दूर होत नाही. धूळ, मातीचा थर, घाम यामुळे मानेवर काळपणा येतो. मात्र, मानेवरील हा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. (Home Remedies for reduce Dark Neck)
टोमॅटो, ओट्सचा स्क्रब
एक ते दोन चमचे टोमॅटोच्या रसामध्ये आवश्यकतेनुसार गुलाब पाणी घेऊन त्यात एक चतुर्थांश वाटलेले कप ओट्स टाका. या मिश्रणाचा स्क्रब बनवून मानेवर लावा. हे स्क्रब 15 ते 20 मिनिटे मानेवर लावल्याने मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास हा उपाय उत्तम परिणाम दाखवेल.
हे ही वाचा – उन्हाळ्यात तोंड येत आहे? मग ‘हे’ तीन उपाय नक्की करा
बेकिंग सोडा पेस्ट
एका वाटीत 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवरील काळपटपणा असलेल्या भागात लावा. मान घासून थोड्यावेळाने पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर मानेवर मॉइश्चरायझर लावा.
बटाट्याचा रस
बटाटा किसून त्याचा रस काढून तो कापसाने मानेच्या काळा भागावर लावा. हा रस किमान 10 ते 15 मिनिटे मानेवर लावून ठेवावा. हा उपाय काही दिवस केल्यास आधिक चांगला परिमाण दिसेल.
हे ही वाचा – निरोगी आरोग्यासाठी खा विड्याचे पान, झटक्यात दूर होतील ‘हे’ आजार
ऑलिव ऑईल, लिंबाचा रस
मानेच्या काळवंडलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस एकत्र करुन दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावावा. यामुळे मानेवरील काळपटपणा दूर होईल. काही दिवस हा उपाय केल्यास आधिक फायदा होईल.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)