सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. तसेच थंडीमुळे अनेकजण स्वेटर परिधान करतात. परंतु तरीही अनेकांना थंडी जाणवते. त्यामुळे शरीर उबदार ठेवण्यासाठी काही पेये पिऊ शकता. मग त्यावर काही उपाय आहेत ते केल्याने शरीर उबदार राहते.
तुम्ही हे पाच पेये पिऊन शरीर उबदार ठेवू शकता.

  • हर्बल चहा –
    हर्बल चहा पिऊन तुम्ही शरीराला उबदार ठेवू शकता. हर्बल चहा प्यायल्याने शरीराला उब मिळते. तसेच तुम्ही ग्रीन टी, तुळशीचा चहा आणि आल्याचा चहाही पिऊ शकता.
  • दालचिनीचे पाणी
  • पाणी घ्या त्यात दालचिनी टाका. नंतर ते पाणी उकळून घ्या. हे मिश्रण प्यायल्याने शरीर उबदार राहते. दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
  • हळदीचे दूध –
  • शरीराला उबदार ठेवण्यासाठी हळदीचे दूध पिऊ शकता. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते.
  • लिंबूपाणी –
  • पाणी गरम करा त्यात लिंबू घाला. त्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
  • बदाम दूध –
  • शरीर गरम करण्यासाठी तुम्ही बदाम दूधही पिऊ शकता. त्यासाठी बदाम बारीक करून त्यात दूध घालून प्या.