डोळयांच्या पापणीला आतल्या बाजूला, कडेला आलेला फोड म्हणजे रांजणवडी. ही रांजणवडी कधी दुखणारी, न दुखणारीही असू शकते. काहींना रांजणवडी आल्यावर ती पुन्हा-पुन्हा येते. रांजणवडी हा फार गंभीर आजार नसला तरी यामुळे डोळ्यांना काहीकाळ त्रास होतो.
रांजणवडीवर घरगुती उपाय
1)खापराचा माठ किंवा रांजणाच्या मातीचा थोडा बारीक भुगा करून तो रांजणवडीवर लावावा. किंवा तांब्याचे नाणे रांजणावर घासून रांजणवडीवर लावावे.
2) बटाट्याचा रस काढून रांजणवडी वर लावावा. यामुळे रांजणवडीचा फोड कमी होतो शिवाय त्याचे डागही डोळ्याच्या त्वचेवर राहत नाही.
3) पेरूची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून रांजणवडीवर लावा. हा उपाय दिवसातून एकदा करावा.
4) कोरफडीचा गर रांजणवडीवर लावावा.
5) हळदीची पेस्ट बनवून कापडाच्या सहाय्याने रांजणवडीवर लावावी.
6) घरी बनवलेले तूप गरम करून कापसाच्या बोळ्याच्या मदतीने रांजणवाडीवर लावा.