अनेकदा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आपल्या सुंदरतेत खोडा घालतात. त्वचेवर डाग पडणे पिंपल्स येण्याची अनेक कारणे असतात. ज्यात पोटसंबंधीत विकारांचाही समावेश आहे. ज्यांना पोटाच्या समस्या असतात, त्यांना चेहऱ्यावर डाग पडणे, पिंपल्स येणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक बनते. अशा वेळी असे 3 खास हेल्दी हर्बल ड्रिंक तुम्हाला तुमच्या समस्येवर अत्यंत गुणकारी ठरू शकतात. ज्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या आणि डागाच्या समस्यांचा निपटारा होईल.

आवळा आणि कोरफडीचा ज्युस :
आवळा आणि कोरफड आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. आवळा आणि कोरफडीचा एकत्रित करून रोज सकाळी त्याचा ज्युस पिल्यास तुमची पिंपल्सची समस्या जटक्यात दूर होईल. या दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळते.

मिक्स फ्रूट ड्रिंक :
संत्रे, टरबूज, डाळिंब याचा ज्युस पिल्याने त्वचा आणि केस दोन्ही चांगले होतात. यातील पोषक तत्व तुमची त्वचा अधिक ग्लोव बनवून ती मऊ देखील होते. त्यामुळे पिंपल्सच्या समस्याही घटतात. तसेच चेहऱ्यावरील डागही कमी होतात.

हळद आणि लिंबु पाणी :
हळदीच्या अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टीरियल गन असतात. जे पिंपल्स दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेला इन्फेकॅशनही होत नाही. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन केल्यास त्वचा तजेलदार आणि मऊ होते.