मासिक पाळी महिलांमध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यातील पहिले 3 दिवस खूप त्रासदायक असतात. यावेळई महिलांना अनेक समस्या येतात, काहींना पोटदुखीची तक्रार असते, तर काहींना पाठदुखी किंवा पाय दुखत असतात. यापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे घरगुती उपाय करा.
मासिक पाळीवेळी वेदना होत असतील तर ओव्याचा वापर करा. एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घ्या. ते पाणी उकळा. नंतर ओव्याचे पाणी कोमट झाल्यावर प्या. दिवसातून दोनदा हे पाणी प्या.
मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय आहे. तो म्हणजे हळदीचे दूध. एक कप दुधात एक चमचा हळद टाका. त्यात गूळ, अर्धा चमचा ओवा आणि सुंठ मिसळा. नंतर ते गरम करून प्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवा.
मासिक पाळीदरम्यान पोट आणि पाठ दुखत असेल तर पाणी गरम करा. त्यानंतर गरम पाण्याने पोट आणि पाठ शेकवा.
मासिक पाळीदरम्यान फळे खा. तसेच भाज्यांपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन करा.
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी आहारही चांगला आणि नेटका करा.