अनेक स्त्रियांचे मासिक पाळीदरम्यान ( menstrual pain) मांड्या, कंबर, पाठ असे अवयव दुखू लागतात. अनेक महिलांना जवळपास 3 ते 4 दिवस या वेदनांतून जावे लागते. काहींना तर चालणेही अवघड बनते. या वेदना सहसा ओटीपोटीत क्रॅम्पच्या स्वरुपात येतात. अशा वेळी महिला अनेकदा पेन किलरचे औषध घेतात. मात्र, भविष्यात यामुळे महिलांना अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी या परिस्थितीत घरगुती उपचार म्हणून जिऱ्याचे (cumin) पाणी पिल्यास वेदनांमधून नक्कीच आराम मिळू शकतो.
जिऱ्याच्या पाण्याचे फायदे
– मासिक पाळी दरम्यान महिलांना ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे असे प्रकार उद्भवतात. याकाळात जिऱ्याचे पाणी पिल्यास वेदना कमी होऊन शरीराला आराम मिळतो. जिऱ्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात एन्झाईम्स आणि अँटीऑक्सिडंट असे घटक असतात. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
– याशिवाय जिरे आणि गूळाचे पाणी पिल्याने सर्दी खोकल्याचा त्रास देखील कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हे पाणी फायदेशीर ठरते. याशिवाय डोकेदुखी कमी होण्यास देखील जिऱ्याच्या पाण्याचा फायदा होतो. अनेकांना वजन वाढण्याची चिंता असते. त्यांनी जिरे आणि गूळाचे पाणी पिल्यास वजनही नियंत्रणात राहते. गुळाने पचनक्रिया सुधारत असल्याने सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो.
कसे बनवावे जिऱ्याचे पाणी
जिऱ्याचे पाणी आपण आपल्या घरात सहज तयार करू शकतो. यासाठी एका भांड्यात एक किंवा दोन कप स्वच्छ पाणी घ्यावे. त्यानंतर त्यात जिरे टाकून एक चमचा गूळ एकत्र करावा. हे पाणी उकळून नंतर थंड करून प्यावे.
टीप : वरील माहिती सामन्यज्ञानावर आधारित आहे. अधिक तीव्र वेदना होत असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.