गुडघेदुखीची समस्या फक्त वृद्धांनाच असते असे नाही. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकंना जाणवू शकते. सध्या थंडीमुळे तर ही समस्या अनेकांना जाणवत आहे. याची कारणेही अनेक आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का यावर आपण आपल्या घरात असलेल्या पदार्थांचा वापर करून मात करू शकतो. त्यासाठी हे पदार्थ खा.

– पपई
तुम्हाला जर गुडघेदुखीची समस्या असेल तर पपई खा. पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच यात आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक आहेत. व्हिटॅमिन-सी आणि कॅल्शियम गुडघेदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी पपई खाल्ली पाहिजे.

– हिरव्या भाज्या
डॉक्टरही हिरव्या आणि ताज्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. शिवाय हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम असते. यामुळे गुडघेदुखीची समस्या दूर होते.

– लसूण
लसूण हा पदार्थ आपल्या घरात सहज उपलब्ध होतो. दूधात लसणाची कळी टाका आणि ते प्या. नाहीतर तुम्ही कोमट पाण्यात लसणाची फोड टाकून पिऊ शकता. असे केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

– अक्रोड
गुडघेदुखीचा त्रास होणाऱ्या लोकांनी अक्रोड खाल्लेच पाहिजे. आरोग्य तज्ञही अक्रोड खाण्याचा सल्ला देतात. यासाठी रोज अक्रोड खाल्ले पाहिजे. रात्री झोपण्याआधी पाण्यात अक्रोड भिजत ठेवा अन् सकाळी उठल्यावर अक्रोड खा.