पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन अधिक बळावतो. पाण्याच्या अधिक सेवनामुळे लघवीद्वारे शरीरातील अनावश्यक टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते. स्टोनचा त्रास असणाऱ्याने दररोज किमान 3 ते 5 लिटर पाणी प्यायला हवे.

लिंबूपाणी
लिंबूपाणी प्यावे. लिंबूमध्ये सायट्रेट असते, जे किडनीमध्ये कॅल्शियम स्टोन तयार होण्याच्या प्रक्रियेस प्रतिबंध करते.

लिंबाच्या रस आणि ऑलिव्ह ऑईल
किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून सेवन करावे. यामुळे स्टोनची समस्या दूर होते. लिंबाचा रस स्टोनचे तुकडे करतो. ऑलिव्ह ऑईल स्टोनला बाहेर पडण्याचा मार्ग सुकर करतो.

मिठाचे सेवन कमी करा
सोडियम हा मीठाचा प्रमुख घटक आहे. सोडियम शोषून घेतलेल्या कॅल्शियमचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे कॅल्शियम मूत्रपिंडात जाऊन ऑक्सलेटसह स्टोन बनते.

तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असते जे किडनी स्टोन तोडण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

टीप : कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.