आजकाल अनेक महिलांना हॉर्मोन्स असंतुलनची समस्या दिसून येते. हॉर्मोन्स म्हणजे शरीरात स्त्रवणारे अंतःस्त्राव. शरीरात अनेक हॉर्मोन्स निर्माण होत असतात, ज्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरू असते. जेव्हा हॉर्मोन्सचे कार्य अनियंत्रित होते तेव्हा निरनिराळ्या आरोग्य समस्या निर्माण होतात. याचे परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतात. महिलांमध्ये या समस्येची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखणं, काम करण्याचा कंटाळा येणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, सेक्सची इच्छा नसणं ही या समस्येची लक्षणे असू शकता. जाणून घ्या महिलांमधील हार्मोन्स संतुलनासाठी उपाय –
योग्य आहार घ्या (Appropriate Diet)
हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्ही योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. यासाठी सेंद्रिय धान्य, फळे, ताज्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. आहारातून मीठ आणि साखर कमी करा. जेवणात वरून मीठ टाकल्यामुळे अथवा चिप्स अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ अतीप्रमाणात खाल्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो.
पुरेशी झोप (Get Enough Sleep)
शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी दररोज वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा. दिवसभरात कमीतकमी आठ तास झोप घ्या ज्यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. अपुऱ्या झोपेमुळे तुमचे आरोग्य बिघडते.
व्यायाम आणि योगासने (Exercise And Yoga)
व्यायामामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत चालते. नियमित व्यायाम आणि योगासने करा ज्यामुळे आरोग्य निरोगी राहील.
रासायनिक पदार्थ टाळा (Avoid Chemical Products)
हार्मोन डिस्टर्ब करणारी सौंदर्यप्रसाधने, प्लास्टिकच्या बाटल्या, पॅकबंद फूड्स कमी वापरावेत.
टीप : जीवनशैलीमध्ये बदल, नॅचरल थेरपी, योगासने, ध्यानधारणा करूनही तुम्ही हॉर्मोन्स संतुलित करू शकता. तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.