आपल्या उचकी लागल्यावर लगेच म्हटलं जातं की कोणीतरी आठवण काढतंय. परंतु आठवण आणि उचकीचा काहीच संबंध नाही हे लक्षात ठेवा. उचकी येण्यामागे अनेक कारणे आहेत. ती काय आहेत आणि उचकी थांबवण्यासाठी काय करावे हे आज आपण जाणून घेऊया.
*उचकी येण्यामागची कारणे-
पचन वा श्वसन प्रणालीमध्ये अडथळा आणि जास्त हालचाल होत असेल तर उचकी सुरू होते. पोट आणि फुफ्फुसे यांच्यामधील डायाफ्राम आणि बरगड्यांचे स्नायूंच्या आकुंचन पावल्यमुळे उचकी येते.
*उचकी येण्याची इतर कारणे
जास्त अन्न खाणे
खूप जलद अन्न खाणे
चिंताग्रस्त किंवा उत्साही असणे
कार्बोनेटेड पेय किंवा अल्कोहोलचे जास्त सेवन
ताणतणाव
तापमानात अचानक झालेला बदल
कँडी किंवा च्युइंगम खाताना जास्त हवा ओढणे.
– उचकी थांबवण्यासाठी उपाय
उचकी थांबवण्यासाठी सोपा उपाय आहे. तो म्हणजे थंड पाणी पिणे. थंड पाणी डायाफ्रामची जळजळ शांत करते. तसेच उचकी थांबवण्यासाठी तुम्ही तुमचा श्वासही काही काळ रोखून ठेवू शकता.