अनेकांना टाचदुखी व तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या जाणवते. यावर काही घरगुती उपाय आहेत. ते उपाय केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो.

कोमट पाणी घ्या त्यात खडे मीठ टाका. नंतर या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. असे केल्याने पायांना शेक मिळतो. तसेच टाचदुखीची समस्या कमी होते.

टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या जाणवते. त्यामुळे मऊ चप्पल वापरा. टाचेला आराम मिळतो.

टाचदुखीवर उपाय म्हणून काही सोपे व्यायामही आहेत. तुम्ही भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं. तसेच पायांच्या बोटांवर उभं राहून थोडसं चालण्याचा प्रयत्न करावा.

गोडेतेल आणि मीठ एकत्र करून लेप तयार करा. हा लेप टाचेवर लावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवा.

बर्फाने टाचेचा दुखणारा भाग १० ते २० मिनिटे शेका. बर्फाच्या थंडाव्यामुळे टाचेच्या मांसपेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते.

विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन घ्या. त्या तुकड्यावर रुईचे पान बांधा आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्या. यामुळे टाचदुखीला आराम मिळेल.