उन्हाळ्यात अनेकांना उन्हाळी लागण्याचा त्रास होतो. उन्हाळी अनेक कारणांमुळे लागू शकते. जाणून घ्या उन्हाळी लागण्याचे कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय

उन्हाळी लागण्यामागचे कारण
आपल्या घामामुळे तसेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे, शरीराचे तापमान उष्णतेमुळे वाढत असल्यामुळे लघवीतील क्षारांचे प्रमाण वाढते त्यामुळेउन्हाळी लागते.

लक्षणे
सतत लघवीला होणे किंवा लघवी करताना जळजळ होणे,
लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते,
अंग गरम होते.

उन्हाळी लागण्यावर घरगुती उपाय

उन्हात फिरणे टाळावे
शक्यतो दुपारच्या वेळी उन्हामध्ये बाहेर जाणे टाळावे.

थंड पाण्याने अंघोळ करावी
उन्हाळ्यात नेहमीच थंड पाण्याने अंघोळ करावी. उन्हाळ्यात वातावरणामुळे शरीराची देखील उष्णता वाढलेली असते. त्यामुळे शरीराची उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात थंड पाण्यानेच अंघोळ करावी.

अधिक प्रमाणात पाणी प्यावे
उष्णतेत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी प्यावे. शक्यतो माठातील पाणी प्यावे. यामुळे तहान लवकर भागते तसेच आरोग्यावर इतर कोणते परिणाम होत नाही. माठातील पाणी उन्हाळीवरही गुणकारी आहे.

पुदिन्याची पाने
उन्हाळी लागली असेल तर थंड पाण्यामध्ये २-३ पुदिन्याची पाने टाकून ते सेवन करा.

गूळ
उन्हाळी लागली असेल तर पाणी आणि गूळ यांचे सेवन करावे. आधी गुळाचा तुकडा चावून खावा नंतर त्यावर थंड पाणी प्यावे.

लेमन टी, ब्लॅक टी
लेमन टी घ्या किंवा मग ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून त्याचे सेवन करा.

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा
लिंबू, संत्री यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन वाढवल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गापासून, उन्हाळीपासून संरक्षण होते.

कैरीचे पन्हे
कैरी पन्ह्यामध्ये वेलची पावडर मिसळून प्या.

धने, जिरे, बडीशेप,खडीसाखर
धने, जिरे, बडीशेप भिजवून बारीक करून पाण्यात मिसळा त्यात खडीसाखर टाकून त्या पाण्याचे सेवन करा.

थंड पाण्यात पाय बुडवून बसा
उन्हाळी लागली असेल तर थंड पाण्यात पाय बुडवून बसा. लवकर आराम मिळेल.

तुळशीची पाने
१०-१५ ताजी तुळशीची पाने १ कप पाण्यात उकळून घ्यावीत, थंड झाल्यावर हे पाणी गाळून त्यात १-२ चमचे मध घालून दिवसातून २-३ वेळा प्यावे.

टीप : घरगुती उपायांनी फरक पडला नाही तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.