दूध आणि मध
दूध व मध सारख्या प्रमाणात घेऊन मिश्रण बनवा. हे मिश्रण केसांना लावा. एक तासाने केस धुवून टाका.
दूध आणि पाणी
दूध आणि पाणी मिक्स करून केसांवर स्प्रे करा. नंतर केस सरळ विंचरा. एक तासाने केस धुवून टाका .
अंड्याचा बलक व ऑलिव्ह ऑईल
अंड्याचा बलक फेटून घ्या. त्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण केसांवर लावा. दोन तासांनी केस धुवून टाका.
नारळ पाणी आणि लिंबू
नारळ पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पाच सहा तास फ्रिजमध्ये ठेवा. नंतर ही पेस्ट केसांना लावा व हलक्या हाताने मसाज करा. नंतर केस धुवून स्वच्छ करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
दूध , मध आणि केळ
एक कप दुधात दोन चमचे मध व अर्धे केळ टाकून मिक्स करा. हे मिश्रण केसांवर लावा. एक तासानंतर केस धुवून टाका.
कॅस्टर ऑईल
केसांना कोमट कॅस्टर ऑईलने मालिश करा. नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून केसांना वाफ द्या. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.