प्रोटीनयुक्त आहार घ्या

केसांना पोषक घटक मिळावेत यासाठी सकस आहार घ्या. दूध, मासे, पनीर यांसारख्या प्रोट्रीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

कांद्याचा रस 

केसांना कांद्याचा रस लावा. अर्धा किंवा एक तासानंतर केस धुऊन टाका. कांद्याच्या रसात भरपूर प्रमाणात सल्फर असते . सल्फर केसांच्या टिश्यूजमधील कॉलेजनची निर्मिती वाढवतात. यामुळे केस तर वाढतात तसेच नवीन केसांचीही निर्मिती होते. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा. यामुळे केस गळती थांबतेच शिवाय केस चमकदार होतात आणि केसांची वाढ देखील होते.

कोमट तेलाने मसाज करा

डोक्याच्या पृष्ठभागावर कोमट तेलाने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढतो तसेच केस मजबूत देखील होतात.
केस जर अति पातळ असतील तर ऑलिव्ह ऑईल वापरा.
मोहरीच्या तेलात (सरसों ऑईल ) मध्ये मेथी टाकून केसांना लावल्यास देखील केस दाट होतील.

शिर्षासन करा

नियमितपणे शिर्षासन करा. यामुळे केसांना चांगला रक्तपुरवठा होतो.

खोबरेल तेल आणि आवळा

खोबरेल तेलात आवळा वाटून मिक्स करून केसांना लावा. . यामुळे केस गळती थांबते शिवाय केस अकाली पांढरे होत नाहीत.

कोथिंबिरीचा रस

कोथिंबिरीचा रस केसांच्या मुळाशी लावा. यातील पोषक तत्त्वांमुळे केस गळती थांबते तसेच केसांची वाढही चांगली होते.

कॅस्टर ऑईल

कॅस्टर ऑईलने केसांना मसाज करा. यामुळे केसांची चमक, मजबूती आणि थिकनेसही वाढते. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करा.

कोरफड

रात्री झोपण्याआधी कोरफडीचा रस किंवा कोरफड जेल केसांना लावा. किंवा रोज दोन चमचे कोरफड ज्यूस घेत जा.