उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरावर घामोळे यायला होते. सुरुवात घामोळे येणे त्रास सुरु झाला की, त्वचेला खाज सुटते, आग होते. घाम त्वचेत तसाच मुरला तो स्वच्छ केला नाही तर शरीरावर घामोळे येतात. आजकाल घामोळे आले की कॉस्मेटिक दुकानात किंवा मेडिकल मध्ये मिळणाऱ्या पावडर घेण्याकडे सगळ्यांचाच कल असतो. मात्र काहींची त्वचा या पावडरमुळे काळवंडते. त्यामुळे काही घरगुती उपायांनी सुद्धा घामोळे घालवता येऊ शकते. जाणून घ्या घामोळ्यांवर घरगुती उपाय
चंदन पावडर
गुलाबपाण्यात चंदन पावडर भिजवून घामोळं आलेल्या त्वचेवर लावा.
लिंबू
अंघोळीच्या थंड पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून आंघोळ करा. त्वचेवर थेट लिंबू किंवा लिंबाचा रस कधीही लावू नये.
गुलाबपाणी
स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरून घामोळ्यांवर लावा. गुलाबपाण्यामुळे घामोळ्यांमुळे होणाऱ्या आगीपासून त्वरित अराम da@daaमिळतो.
कडुनिंब
गरम पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर या पाण्याने आंघोळ करा.
बर्फ
एका पातळ कपड्यात बर्फ गुंडाळून घामोळे आलेल्या त्वचेवर लावा. यामुळे त्वरित थंडावा मिळतो.
मुलतानी माती
मुलतानी माती पाण्यात मिसळून घामोळे आलेल्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा दाह कमी होतो.