1 ) कोमट पाण्यात पाय बुडवून बसा
कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात 10-15 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. या उपायामुळे पायांना आलेली सूजदेखील कमी होते.
2) आरामदायी शूज, चप्पल वापरावी
दैनंदिन वापरामध्ये आरामदायी चप्पल किंवा शूज वापरावेत.
3) मेथीचे पाणी
ग्लासभर पाण्यात चमचाभर मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या.
4) नियमित योगा करा
नियमित योगा केल्यामुळे पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे पाय दुखत नाहीत.
5) अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर ज्यूस वेदनाशामक आहे. त्यामुळे पाय दुखीचा त्रास होत असेल तर अॅपल सायडर व्हिनेगर ज्यूस प्यावा. ग्लासभर कोमट पाण्यामध्ये 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर आणि चमचाभर मध टाकून ज्यूस बनवा.
6) मालिश करा
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल, लवंग तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा कोणत्याही वेदनाशामक तेलाने पायांची मालिश करावी.
शेक द्यावा
रात्री झोपताना गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने 5-10 मिनिट पाय शेकवावेत.
7) योग्य आहार घ्यावा
आहारामध्ये व्हिटॅमिन बी-12 चे प्रमाण वाढवावे. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी पालेभाज्या खाव्यात.
टीप – अधिक प्रमाणात आणि रोजच पाय दुखत असतील तर, वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. कारण कधीकधी हाडांच्या दुखण्यामुळेही पाय दुखतात.