पोट बिघडणं, उलट्या, जुलाब यांचा त्रास फूड पॉयझनिंग झाल्यावर उद्भवतो. प्राथमिक स्वरूपाच्या तक्रारी असतील तर काही घरगुती उपाय करून पहावेत. जाणून घ्या फूड पॉयझनिंगवर घरगुती उपाय –

जिरे
जिऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते. एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येचा त्रास कमी होईल.

आलं
फूड पॉयझनिंग झाल्यावर आलं घालून चहा प्या. आल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या वाढवणाऱ्या बॅक्टेरीयांची वाढ होण्यास आळा बसतो.

लसूण
लसणात अँटी व्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे गुण असतात. यामुळं डायरिया आणि पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.
एक- दोन लसणीच्या पाकळ्या खाल्ल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यायलास फूड पॉयझनिंगवर त्वरीत आराम मिळतो.

लिंबू पाणी
चिमूटभर साखर लिंबू पाण्यात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावं. यामुळं फूड पॉयझनिंग कमी होतं. लिंबू पाण्यामुळं पोटात इन्फेक्शन वाढवणारे बॅक्टेरिया कमी होतात.

मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असतं. मधामुळं ऍसिडिटी कमी होते आणि फूड पॉयझिनिंगपासून आराम मिळतो. एक चमचा मधात थोडा आल्याचा रस मिसळा. हे मिश्रण घेतल्यानं पोटदुखीवर आराम पडेल.

तुळस
एक ग्लास पाण्यात ताजी तुळशीची पानं टाकून उकळून घ्यावं. हे पाणी थंड झाल्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावं.

अ‍ॅपल सीडर व्हिनेगर
एक कप गरम पाण्यात दोन चमचे अ‍ॅपल सीडर व्हिनेगर घालून ते पाणी प्यायल्यास फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल.

टीप : ( वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक स्वरूपाच्या तक्रारी असतील तरच घरच्याघरी उपाय करावेत. मात्र त्रास खूप जास्त होत असेल, तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. )