ध्यानधारणा, प्राणायम आणि योग करा. यामुळे मन एकाग्र राहून स्मरणशक्ती वाढते.
मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
पिंपळाच्या पानाची पिकलेली ५ फळं रोज खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती वाढते.
७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश करा.
शंखपुष्पीचे सेवन करा. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी स्मरणशक्ती वाढते.
नियमित गुलकंदाचे सेवन केल्यानेही स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते.
बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खा.
महत्वाच्या गोष्टींचा विचार करताना डोळे बंद करा.
आठवड्यातून एकदा भोपळ्याची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
जेवणाअगोदर एक सफरचंद खाल्ल्यानेही स्मरणशक्ती वाढते.
बीटरूटचा २ कप रस दिवसातून एकदा प्या.
नियमितपणे आक्रोडचे सेवन करा.
आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.