अति तेलकट पदार्थ खाणे, हवामानात बदल, इन्फेक्शन, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यांसारख्या कारणाने घसा कोरडा पडणे, सुकल्यासारखा वाटणे, घश्यात जळजळ होणे यांसारखे त्रास होतात. विशेष करून उन्हाळ्यात घसा कोरडा पडण्याची समस्या अधिक जाणवते. काही घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येवर उपाय करता येऊ शकतात.
गरम पाण्याची वाफ घ्या
सकाळी किंवा संध्याकाळी गरम पाण्याची वाफ घ्या. पाण्याच्या वाफेमुळे घशातील बॅक्टेरीयल इंन्फेक्शन तात्काळ कमी होते.
भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घसा कोरडा पडतो. म्हणून भरपूर पाणी प्या.
खडीसाखर
खडीसाखरेमुळे तरतरी येते. शरीराला लगेच ऊर्जा मिळते. घसा कोरडा पडल्यावर १-२ खडीसाखरेचा खडे चघळावेत. खडीसाखर खाल्ल्याने अशक्तपणाही दूर होतो.
मध
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात २ चमचे मध मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे घसा कोरडा पडत नाही. तसेच कोरडा खोकला, घसा खवखवणे यांसारखे आजार देखील होत नाहीत.