कोरडा खोकला खूप त्रासदायक असतो. कोरडा खोकला कफ निर्माण करीत नाही. तुम्हाला जर कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता –

मिठाचे पाणी
मीठ हा आपल्या घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. गरम मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने त्वरीत आरामच मिळणार नाही तर दीर्घकाळापर्यंत बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत होईल. एक कप गरम पाण्यात एक चमचा मीठ घाला. नंतर 20 सेकंदांसाठी दिवसातून 3 वेळा गुळण्या करा. बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

आले
आयुर्वेदात, कोरड्या खोकल्यासह अनेक आरोग्याच्या समस्यांमध्ये आले एक उत्कृष्ट उपाय मानले जाते. त्याचे औषधी गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि त्याचे बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म शरीराला बर्‍याच प्रकारच्या व्हायरसपासून वाचवितात. गरम आले आणि लवंगाचा चहा प्यायल्याने कोरड्या खोकल्यापासून सुटका होते.

मध
मधात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. जे कोरडा खोकला आणि घश्यात होणारी खवखव कमी करण्यास मदत करतात. हे अँटीऑक्सिडंटयुक्त आहे जे बरे करण्यास मदत करतात. कोमट पाण्यात 2 चमचे मध मिसळल्याने घशातील खवखव दूर होते. जर तुम्हाला लवकर आराम मिळवायचा असेल तर हे दिवसातून दोनदा प्या.