लिंबू आणि साखर
त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू गुणकारी मानले जाते. 3 चमचे लिंबाचा रस घ्या. त्यात थोडी साखर मिसळा. नंतर ते 7 ते 10 मिनिटे अंडरआर्म्सवर लावा आणि मसाज करा.

बेसन आणि दह्याचा पॅक
अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दह्याचा पॅक हळद घालून लावा. 10 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.

बटाट्याचा रस
त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर आहे. बटाट्याचा रस अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणाची समस्या दूर होण्यास मदत होते.

ओट्स आणि मध
ओट्स आणि मधाचा वापरही त्वचा चमकदार करण्यासाठी केला जातो. ओट्स मधात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण अंडरआर्म्सवर स्क्रब करा. काही वेळाने ते स्वच्छ धुवा.

लिंबू आणि मध
लिंबू आणि मध एकत्र मिसळा. त्यानंतर हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे अंडरआर्म्सवर राहू द्या. नंतर थंड पाण्याने ते धुवा. नक्कीच फरक जाणवेल.

चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ योगासने

कोमट पाणी पिण्याचे फायदे