त्वचा कोरडी असलं किंवा व्यवस्थित काळजी घेतली नाही तर टाचांना हमखास भेगा पडतात. नियमित पायांच्या तळव्यांची आणि टाचांची काळजी घेतल्यास टाच आणि तळव्यांना भेगा पडत नाही. जाणून घ्या पायांचे तळवे, टाचा सुंदर आणि मऊ बनवायचे असतील तर कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात –
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय पंधरा मिनीटे बुडवून ठेवा. भेगा पडलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावा व सॉक्स घाला. सकाळी कोमट पाण्यात पाय बुडवून स्वच्छ करा.मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर ठेवा.
मॉश्चराईझर लावा
रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या टाचांनादेखील मॉश्चराईझर लावा आणि त्यावर मोजे घाला. मॉश्चराईझर मुरल्याने पायाची त्वचा मऊ आणि मुलायम होते.
तिळाच्या तेलाने मालिश करा
तिळाचे तेल जखम बरी करण्यासाठी उपयोगी आहे तसेच तिळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे त्वचेतील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात. तिळाच्या तेलामुळे टाचा आणि तळव्यांची त्वचा मऊ आणि मुलायम बनते.
लवेंडर ऑईल लावा
नियमितपणे तळव्यांना आणि टाचांना लवेंडर ऑईलने मालिश केल्यामुळे पायांच्या टाचा आणि तळवे अधिक सुंदर आणि मऊ बनतात.
टीप : तिळाचे तेल आणि लवेंडर ऑईल मिक्स करून देखील पायाच्या टाचांना आणि तळव्यांना लावू शकता. एक चमचा तिळाच्या तेलामध्ये १ ते २ थेंब लवेंडर ऑईल टाकावे.