रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय पंधरा मिनीटे बुडवून ठेवा.
भेगा पडलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावा व सॉक्स घाला. सकाळी कोमट पाण्यात पाय बुडवून स्वच्छ करा.
मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर ठेवा.
मेण वितळून घ्या. त्यात थोडी बोरिक पावडर मिसळून टाचांच्या भेगांवर लावा.
रात्री झोपताना कडुलिंबाचा रस काढून पायांच्या भेगांमध्ये भरा. सकाळी पाय व्यवस्थित स्वच्छ करा.
आंबेहळद , लोणी आणि मीठ एकत्र करून टाचांना लावा.
गुलाबपाणी , ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र मिसळून तळव्यांना मालिश करा.
हळदीमध्ये कोमट तेल टाकून पेस्ट बनवा ही पेस्ट पायाच्या भेगांमध्ये भरा.