सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. त्यामुळे या मोसमात अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या जाणवतात. मग त्यावर काय उपाय करावेत हे समजत नाही. हिवाळ्यात सर्दीचा त्रास तर अनेकांना जाणवतो. काही वेळेस तर नाक बंद होते. तसेच नाकात अनेक वेळा सूज येते. त्यावर काही घरगुती उपाय आहेत. जे केल्याने तुम्हाला लगेच या समस्येपासून आराम मिळेल.
चला तर मग जाणून घ्या बंद नाकातून सुटका हवी असेल तर काय करावे.
– घरात कांदा सहज उपलब्ध होतो. त्यामुळे कांदा घ्या आणि त्याच्या सालीचा वास घेत राहा. सतत चार ते पाच मिनिटे ही प्रक्रिया करा. असे केल्याने तुम्हाला बंद नाकापासून लगेच आराम मिळेल.
– बंद नाकापासून तात्काळ सुटका पाहिजे असेल तर कांद्याचा रस नाकात टाका. त्यासाठी लाल कांदा घ्या. त्याचा रस काढा अन् काही थेंब नाकात टाका.
– बंद नाकामुळे वा सर्दीमुळे तुमच्या नाकाला सूज आली असेल तर त्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. कांद्यात नाकातील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करणारे गुणधर्म आहेत.
(टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.)