सध्या थंडीचा मोसम सुरू आहे. त्यामुळे अनेकजण उशिरा उठण्याचा प्लॅन बनवतात. सध्या थंडीही जास्त आहे त्यामुळे ही सवय चांगली आहे. परंतु झोपेतून उठल्यानंतर अनेकांना अंगदुखीची समस्या जाणवते.
अंगदुखीची अनेक कारणे असू शकतात. थंड हवामानामुळे स्नायूंवर ताण पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सांधे दुखू शकतात. तर सुर्यप्रकाश शरीराला कमी मिळाला तर हाडे अन् स्नायू दुखू शकतात. शरीरात हॉर्मोनल बदल झाल्यास हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास वाढू शकतो.
जाणून घेऊया अंगदुखी टाळण्यासाठी काय करावे?
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम. हिवाळ्यात व्यायाम केल्याने खूप फायदे होतात. बाहेर पडता येत नसल्यास घरातच पुरेसा व्यायाम, शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे.
– दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. दिवसभर कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
– थंडीत घराबाहेर पडण्याआधी शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे परिधान करा.
– अंगदुखीचा त्रास होत असेल तर क, ड आणि के जीवनसत्त्वे असलेले अन्न खावे. हिवाळ्यात पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांसारख्या गोष्टींचे सेवन करावे.
– अंगदुखी टाळण्यासाठी स्ट्रेचिंग हाही सर्वात चांगला उपाय आहे. यासाठी सायकल चालवणे, मॉर्निंग वॉकला जाऊ शकता.
– सकाळी उठल्यानंतर रोज गरम पाणी प्या.