निरोगी जीवनासाठी रक्तदाब (ब्लड प्रेशर) नॉर्मल असणे खुप आवश्यक आहे. आजकाल बदललेली जीवनशैली आणि आहार यांमुळे रक्तदाबाच्या समस्यांमध्ये मोठ्या वाढ झाली आहे. मात्र काही पथ्ये आणि पदार्थ यांच्या मदतीने रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे, रोज व्यायाम करावा. जाणून घ्या रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा तसेच रक्तदाबाच्या समस्येवर घरगुती उपाय –

लसूण
दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश करा. लसूण सेवन केल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. ज्यामुळे रक्तदाबासह कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोल राहते.

चहा किंवा कॉफी
रक्तदाब एकाएकी कमी झाल्यास, चहा किंवा कॉफी सारखे पेयपदार्थ घ्यावे. हे रक्तदाबाला वाढण्यास तात्पुरती मदत करतं.

तुळशीची पाने
कमी रक्तदाब असणाऱ्यांनी सकाळी ५-६ तुळशीची पाने चावून चावून खावी. तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते, जे  रक्तदाबाला नियंत्रित करण्यास मदत करते. हे युजेनॉल नावाच्या अँटीऑक्सीडंटने देखील भरलेले असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

गाजर
दोन दिवसातून एकदा गाजर आणि पालकाचा रस घ्यावा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बीट
कमी रक्तदाबाची समस्या असेल तर दिवसात दोनवेळा एक कप बीट ज्यूस प्या.

ब्राऊन राईस
ब्राऊन राईसचे सेवन करा. यात मीठ, कोलेस्टरोल आणि चरबी कमी असते.

( टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. उपचारापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. )