पोट फुगण्याची (Bloating )समस्या कोणत्याही ऋतूत होऊ शकते. पण उन्हाळ्यात ही समस्या अगदी सामान्य आहे. अनेक वेळा आपण तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातो, त्यामुळे पोटात गडबड होते, याचे महत्वाचे कारण हे अन्न पोटात नीट शोषले जात नाही त्यामुळे आपल्या पोटात गॅस तयार होतो. पुढे हाच गॅस पोटफुगीचे (Bloating )कारण बनू शकतो. अनेकांना उन्हाळ्यामध्ये पोटफुगीच्या त्रासाचा सामाना करावा लागतो त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पोट फुगीवर उपाय (Bloating Remedies) म्हणून आहारात चार गोष्टींचा समावेश केल्यास तुम्हची यापासून सुटका होऊ शकते. जाणून घेऊयात

पोट फुगल्यामुळे इतर काम करतानाही त्रास होतो, पोट जास्त बिघडले तर शांत झोपणे कठीण होते. पोट फुगीवर आराम मिळवायचा असेल तर घरगुती उपायांनी आता हे शक्य आहे. त्यासाठी स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींचा अवश्य वापर करा.

1. पुदीना (Mint)

पुदिन्याची पाने एका ग्लास पाण्यात ठेवा आणि काही वेळ राहू द्या आणि नंतर दिवसातून अनेक वेळा प्या. थोडक्यात ही पाने पाण्यात भिजत घालायची आहेत. पुदीन्याचे हे पाणी पिल्यास पोटात थंडावा राहून पोट फुगण्याची (Bloating Remedies) समस्या होत नाही.

2. छोटी वेलची (Cardamom)

छोटी वेलची 1 ग्लास पाण्यात भिजून ठेवा त्यानंतर हे वेलचीचे पाणी जेवणझाल्यानंतर एका तासाने प्या. यामुळे तुम्हच्या पोटाला मोठा आराम मिळण्यास मदत होईल.

3. बडीशेप (Fennel)

सर्वप्रथम एका भांड्यात बडीशेप मंद गॅसवर भाजून घ्या. भाजलेल्या ही बडीशेप जेवनानंतर थोडी-थोडी खा. पोट फुगीच्या समस्येवर बडीशेप गुणकारी आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

4. ओवा (Celery)
जेवल्यानंतर साधारण 30 मिनिटांनी कोमट पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळा आणि नंतर ते प्या. याच्या सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही.