ब्लॅक टी आणि मीठ
एक कप ब्लॅक टीमध्ये एक चमचा मीठ मिसळावे. हे मिश्रण केसांना लावावे आणि एक तासानंतर केस धुवावेत.
साजूक तूप
साजूक तुपानं केसांच्या मुळांशी मालिश करावी आणि एक तासानंतर केस धुवावेत. आहारात देखील साजूक तुपाचा वापर करावा.
आवळ्याचे तेल
आवळ्याचे तुकडे करून ते सावलीत सुकवावेत. नंतर हे तुकडे खोबरेल तेलात उकळून घ्यावेत. हे तेल थंड करून बाटलीत भरून ठेवावे. तसेच नियमितपणे हे आवळ्याचे तेल केसांना लावावे.
कांद्याचा रस किंवा पेस्ट
कांद्याचा रस किंवा पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावावी. हा उपाय नियमित करत राहिल्यास केस काळे तर होतातच, शिवाय केस गळणेही थांबते आणि केसांची वाढ होऊन ते मुलायम बनतात.
कढीपत्ता
कढीपत्त्याची पेस्ट तयार करून केसांना लावावी. अर्ध्या तासानंतर केस धुवावे. यामुळे केस काळे होतात तसेच त्यांची चमक वाढते.