साय
ओठांना रात्री झोपताना दुधावरची साय लावावी. साय मॉईश्चरायझरचे काम करते. यामुळे ओठ फाटत नाहीत तसेच मुलायमही बनतात.
पाणी
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम ओठांवरही होतो. परिणामी ओठ फाटतात किंवा रुक्ष बनतात. त्यामुळे दिवसभरातून जवळपास नऊ ते दहा ग्लास पाणी जरूर प्यावे.
तूप
i ) रात्री झोपताना ओठांना तूप लावावे.
ii ) एक चमचा तुपात चिमूटभर मीठ टाकून गरम करा. हे मिश्रण थंड झाल्यावर ओठांवर लावा व हलक्या हाताने मालिश करा.यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते व ओठ मुलायम बनतात. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
मध आणि साखर
दोन चमचे साखरीमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण ओठांना लावून दोन मिनिटं हलक्या हाताने मसाज करा नंतर ओठ थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.
साय व केशर
दुधाच्या सायीमध्ये केशराच्या दोन-तीन काड्या मिसळा व हे मिश्रण रात्री झोपताना ओठांना लावा. हा उपाय नियमितपणे केल्यास आठ दिवसांत फरक जाणवेल.
गुलाब पाकळ्या व साय
गुलाब पाकळ्या व साय एकत्र करून त्यांची पेस्ट बनवा. रात्री झोपताना ही पेस्ट नियमित पाने ओठांना लावा.
गुलाब पाकळ्या आणि दूध
गुलाब पाकळ्या रात्रभर दुधात भिजत घाला आणि सकाळी ओठांवर लावा. हलक्या हाताने मसाज करा. सुकल्यानंतर ओठ थंड पाण्याने स्वच्छ करा.
home remedies for beautiful and pink lips